Monday, January 5, 2015

अज्ञात वाटा ...

अज्ञात वाटा ...
शोधतेय हे आयुष्य माझे
विखुरलेल्या त्या स्वप्नांना
कधीकाळी जे आले होते
पहाटे पडल्या दवा प्रमाणे।
सापडले नाही बालपण तेंव्हा
ढगांत दडलेल्या चेहरयां मध्ये
तरी सुध्दा तमाशात हसलो
तुझ्या, जीवना जोकर प्रमाणे।
सावली सुध्दा असायची कधी
वाटसरू सोबती उन्हा मध्ये
अंतर मात्र वाढवीत आहे
अज्ञातात नेणारया वाटे प्रमाणे।

Sunday, January 4, 2015

जीवन ...

कंटाळा आलाय जगण्याचा ....

पुन्हा पुन्हा त्या चुका करण्याचा
सारखा मनाचा खेळखंडोबा  करण्याचा 

विफल परिस्थितीत मार्ग शोधण्याचा
अन पुन्हा त्याच चुका करण्याचा

कंटाळा आलाय जगण्याचा ...

सुखाचा मार्ग शोधण्याचा
मरण रुपी विरह भोगण्याचा

कुणाच्या निरर्थक आशेवर जगण्याचा
अन आपल्याच मनाच्या सांत्वनाचा

कंटाळा आलाय जगण्याचा ...

माझ्यातला मी शोधण्याचा
अन दुनियेतला मी शोधण्याचा

प्रयत्न करतो आहे मरणाचा
आभासही नाही या जगण्याचा .

मन

मन

मनवेडं बावरं माझ,
कल्पनेत रमुन जातो;
येशिल कधी स्वप्नी
प्रतिक्षेत एकटाच जागतो!