Thursday, November 27, 2014

मन वेड =_=

मन किती वेड 
किती समजवल तरी 
समजत नाही
त्याची धाव नेहमी तुझ्या कडेच |
तुझ्या शिवाय त्याला काही सुचत नाही

जग सुखी जीवनसाठी
देवा कड़े साकडे घालते
पण मी दररोज तुलाच मागते
तू सुखी राहव|
आपल्या दोघांच्या स्वपनातील
आंगन नेहमी किलबिलत राहाव
तुझ्या नावाने लावलेले 
कुंकु जन्मभर माझ्या माथि
शोभाव|
आणखिन पण ह्या वेड्या
मनाच्या आशा आहेत खुप

कधी वाटते पदराची साउलि
करावी तुझ्या वर|
कधी वाटते तुझ्या समवेत 
उंच आकाशी भरारी घ्यावी
कधी वाटते छोट मूल|||
होऊंन कुशीत झोपव

खरच मन किती वेड
असत ना
नुसती स्वप्न पाहत|
पण सत्य हे काय हे त्याला कधीच कळत नाही
ते आपल्या स्वप्नाच्या दुनियेत 
मस्त असत
अस हे वेड मन|
प्रत्येका जवळ आहे !!!!

        दुर्गा वाड़ीकर 

No comments:

Post a Comment