Friday, June 8, 2012**** दगाबाज आयुष्य ****

तुझे ते हास्य जीवनी
गंध फुलाचा देऊन गेला.
फक्त तुझ्या हसण्यासाठी
लाख चुका माफ तुला.

तुझ्या एकदा येण्याने
आसमंत हा आज खुलला
फक्त तुझ्या येण्यासाठी
आसमंत हा धरणीवर झुकला.

तुझ्या नुसत्या बोलण्याने
मानाने आकांत केला
फक्त तुझे बोल ऐकण्यासाठी
चारीदिषा वादळ उठवीत गेला.

तुझ्या माझ्या भेटीसाठी
माझ्या हृदयाने हट्ट केला
फक्त तुझी एक हाक ऐकण्यासाठी
साऱ्या आयुष्याने धोका दिला.........


No comments:

Post a Comment