Friday, June 8, 2012


आता संपलयं ते सारं.... 
आता संपलयं ते भास होणे, 

तू नसल्याठिकाणी तुला पहाणे, 

तू समोर असल्यावर, 

स्वतःलाच विसरून जाणे..... 

आता संपलयं ते सारं.... 

image.png

आता संपलयं ते तुझे शब्द आठवणे,

तू बोलत असताना माझे गप्प होणे,

आणि,

तुला एकटक बघत रहाणे......

आता संपलयं ते सारं....

आता संपलयं तुझ्यासाठी घरी थापा मारणे,

extra-classच्या नावाखाली तुला भेटणे,

तासनतास बोलत रहाणे,

आणि, फोनचे बिल वाढवणे.....

आता संपलयं ते सारं....

आता संपलीयेत ती भांडणे,

शुल्लक गोष्टीवरून रूसणे,

थोडा वेळ अबोला धरणे,

आणि, नंतर मीच ..

sorry sorry sorry म्हणणे...

आता संपलयं ते सारं....

आता संपलयं एकटे असता तुला आठवणे,

तुला आठवून माझे हळवे होणे,

रात्रभर एकच गाणे ऐकणे,

आणि, कधी,

हळूच अलगद डोळ्यांतुन पाणी ओघळणे,

आता संपलयं ते सारं...

आता संपलयं ते तुझ्यासाठी श्वास घेणे,

तुझ्यासाठी जगणे, आणि,

तुझ्यासाठी तुझ्यावर कवितांवरकविता करणे...

आता संपलयं ते सारं........

No comments:

Post a Comment