Sunday, June 3, 2012शिवाजी महाराज स्वप्नात आले आणि....

एकदा महाराज मला भेटले,
झोपेत पाहून जोरात कडादले,
"अरे मावल्या झोपतोस काय?,
कोम्ब्डा अरवला ऐकू येत नाही काय?",
"महाराज हयात दोष माझा नाय ,
थंड AC आणि गजराच्या युगात,
कोम्ब्डया च महत्व तरी काय?"

महाराज हसले अणि म्हणाले ,
"चल भवानी मातेच दर्शन घेउया,
ह्या युगातला महाराष्ट्र पाहुया"
दर्शन घेउनी महाराजांनी सर्व किल्ले पाहिले,
शेवटी राजगडअ वर येउनी स्तब्ध राहिले,
म्हणाले,"काय रे दशा झाली या किल्ल्यांची आज?
ज्यांना पाहुनी डगमगले होते पातशाही ताज!!!
मी म्हणालो ,"महाराजअहो इथे इतिहास आठवतो तरी कुणाला आज?
रेव्ह पार्ट्या करतांना ह्या लोकांना वाटत नाही लाज...!

महाराज विचलित झाले,
म्हणाले,"चल येथून जाऊ यात ,
महाराष्ट्राची राजधानी पहुयात",
महाराजान्सोबत मुंबईत आलो,
तिथल्या झगमगाटआत पूर्णपणे हरवलो,
मुंबई बघता बघता २६/११ च प्रसंग ऐकविला,
तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या महाराजांनी मलाच प्रश्न केला,
"तुम्ही त्या नाराधामाला जित्ता कैसा सोडिला?"
उत्त्तर काय देणार माझाच चेहरा पडला ,
म्हणालो महाराज ,"तो पहा तो कसब त्यानेच हा प्रसंग घडविला,
पण आजच्या लोकशाहीत न्याय आहे प्रत्येकाला नाही तो फक्त माणुसकीला ....!
वरून आमचेच नेते म्हणती,तुमचेच लोक फितूर ,
बलिदान गेले वाया मरणयास होते आतुर...!!

महाराज काही बोलले नाहित,
सारख काही तरी विचार करीत राहित,
चालता चालता महाराजांना एक दृश्य दिसल ,
एक इसमास ४-५ जणांनी मरला,
महाराजानी हे हेरल,
ऐसे काय त्याने केल?
म्हणालो ,"महाराजतो 'भैय्या',परप्रांतीय ,
म्हणुनच त्यासी धरिल...!
यंदा मात्र प्रश्न पडला महाराजन्नाच,
कवी भूषण अणि कलश यांचा विसर पडला माझ्या रयतेलाच?

फिरता फिरता समुद्र किनारी आलो,
महाराजांच्या पुतल्याची कल्पना करुनच प्रफुल्लित झालो,
महाराजांना म्हणालो,
"महाराज,तुमच्या पुतल्याच्या उभारनी साथी उभा आहे तुमचा एक पाईक,
परन्तु तयासी विरोध करिति आपलेच सरनाईक",
महाराज चमकले,
म्हणालो "महाराज,कोणास म्हणावे आपुले अणि कोणास परके,
तुमच्या नावाने येथे जातीचे राजकारण जाहले...!!!!"
महाराजांना जे समजायचा ते ,ते समजले,
अणि परत हसले....
शेवटी मला फक्त एवढच म्हणाले ,
"हे दिवस पाहण्यासाठी का केलि होती आम्ही रचना स्वराज्याची?
त्यासी जोड़ होती १८ पगड जातींची...,
आज हिन्दुस्तानत परत गरज आहे त्या मावल्यांची,
उठ मावल्या उठ हाक आहे ही मातीची......!!!!!!!!

उठ उठ म्हणताच मला जाग आली,
खरच का माझी आणि महाराजांची भेट झाली?
मन महाराजांच्या विचारत गुंतून होते गेले,
पण खरच एकदा महाराज होते मला भेटले....!!!!!
जय भवानी..!!!
जय  शिवाजी...!!!

No comments:

Post a Comment